Chandrakant Patil : सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणे हे भाजपचे कर्तव्य आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर लागलेल्या पोट निवडणूकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेत्या सुनेत्रा पवार निवडणूक लढवित आहेत.
Chandrakant Patil

Chandrakant Patil

sakal

Updated on

माळेगाव - महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा सत्ताधारी भाजपचा सहयोगी पक्ष म्हणून कार्य़रत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बारामती विधानसभा पोट निवडणूकीमध्ये विक्रमी मताधिक्याने निवडून आणणे आमचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यानुसार बारामतीत भाजपची ताकद सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभा करण्याच्याचे काम आम्ही करीत आहे. त्यामुळे सध्याला बारामतीत भाजपच्या प्रचार कामाला सन २०२९ ची तयारी संबोधने योग्य नाही, अशी भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com