

Baramati Election Result
esakal
माळेगाव: राज्यातील राजकारणाला अंतर्मुख करणाऱ्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची खोल छाया आज बारामती येथील मतमोजणी केंद्रावर स्पष्टपणे जाणवत होती. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना यश मिळाले असले, तरी या विजयावर आनंदाचा जल्लोष नव्हता, तर अजितदादांच्या आठवणींनी गहिवरलेली मनं होती.