'प्लाझ्मा दान करण्यासाठी बारामतीकरांनी पुढाकार घ्यावा'

'प्लाझ्मा दान करण्यासाठी बारामतीकरांनी पुढाकार घ्यावा'

बारामती : कोरोना रुग्णांना वरदान ठरेल असे प्लाझ्मा दान करण्यासाठी आता बारामतीकरांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते चंद्रवदन शहा (मुंबईकर) यांनी केले आहे. 

चंद्रवदन शहा यांनी इंदापूरला जाऊन प्लाझ्मा दान केले. त्यांनी दिलेल्या प्लाझ्मा बारामती तालुक्यातील एका गंभीर रुग्णाला काल देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती आता हळुहळू सुधारते आहे. बारामती शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने आता प्लाझ्माची गरज भासू लागली आहे. 

बारामतीत प्लाझ्माची सुविधा उपलब्ध नसल्याने इंदापूरला जाऊन प्लाझ्मा दान करावे लागत आहे. मात्र तरिही आपल्या प्लाझ्मा देण्यामुळे अनेकांचा जीव वाचू शकत असल्याने बारामतीकरांनी आता या बाबत पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन चंद्रवदन यांनी केले आहे. 

प्लाझ्मा दान हे रक्तदानाइतकेच सोपे असते, त्याने शरीराचे कसलेही नुकसान होत नाही उलट आपल्या प्लाझ्मामुळे एखाद्याचा जीव मात्र नक्कीच वाचू शकतो, त्या मुळे आता बारामतीकरांनीही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यायला हवे. बारामतीत दररोज किमान बारा बॅग प्लाझ्माची सध्याची मागणी आहे, मात्र बाहेरगावाहून यातायात करुन या बॅग मिळवाव्या लागत आहेत. 

कोण प्लाझ्मा दान करु शकतो...
•    ज्याला कोविड होऊन गेला आहे, असे रुग्ण कोविड निदानाच्या तारखेपासून 28 दिवस पूर्ण झाल्यावर कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असेल तर  90 दिवसांच्या आत दोन वेळा प्लाझ्मा दान करु शकतात. 
•    या शिवाय ज्यांनी लसीचे दोन डोस घेतलेले आहेत, असे लोक पहिल्या डोसच्या तारखेनंतर 50 दिवसांनी प्लाझ्मा दान करु शकतात.
•     प्लाझ्मा दान करण्यासाठी अँटीबॉडीज काऊंट 15 च्या पुढे असला पाहिजे.
•     प्लाझ्मा दान करण्यासाठी आयजीजी तपासणी आवश्यक आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com