Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी म्हणजेच 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद रविवारी (ता. 28) बारामतीत झाली. आजचा दिवस कमालीच्या उष्णतेचा असल्याने बारामतीकर भाजून निघाले.
Pune Weather Update
Pune Weather Update sakal

बारामती : यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी म्हणजेच 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद रविवारी (ता. 28) बारामतीत झाली. आजचा दिवस कमालीच्या उष्णतेचा असल्याने बारामतीकर भाजून निघाले. गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीत उष्णतेची लाट आहे. आज मात्र तापमानाने उच्चांक गाठला. रविवार असल्याने व त्यात उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने बारामतीच्या रस्त्यांवरील वर्दळही आज मंदावली होती. अत्यंत महत्वाचे काम असेल तरच लोक घराबाहेर पडत होते.

दुचाकीवरुन प्रवास करणा-यांना उन्हाच्या झळांनी अक्षरशः भाजून काढले. टोपी व गॉगलशिवाय बाहेर पडणे अनेकांना अवघड झाले होते. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनाही आज कमालीच्या उन्हाचा सामना करावा लागला.

Pune Weather Update
Buldhana Weather Update: उन्हाच्या झळा जाणवू लागल्या, पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती

दुपारच्या सत्रातला प्रचार टाळून दुपारी बारा पर्यंत व संध्याकाळी पाचनंतरच प्रचाराचे नियोजन सर्वच राजकीय पक्षांनी केलेले दिसले. उन्हाच्या तीव्रतेने रसवंतीगृह, आईसक्रीम पार्लर, सरबत, ताक, लस्सी यांना मागणी वाढली आहे. पिण्याच्या पाण्याच्या थंड बाटल्यांचाही खप कमालीचा वाढला आहे. गॉगल व टोपीच्या विक्रीतही चांगलीच वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com