

UN FAO Recognises Baramati’s Farmer-Centric AI Research for Global Summit
sakal
बारामती : शेतीतील प्रयोग, शिक्षण आणि संशोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या बारामतीचा आवाज आता थेट जगाच्या व्यासपीठावर घुमणार आहे. बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित संशोधनाची दखल संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) घेतली असून, इटलीतील रोम येथे होणाऱ्या जागतिक परिषदेसाठी या संशोधनाची निवड करण्यात आली आहे.