Agriculture College Baramati
sakal
माळेगाव - कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन, नवकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसमोरील समस्या सोडविण्याच्या दिशेने ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या चार नाविन्यपूर्ण कल्पनांना ‘यूके पेटंट’ प्राप्त झाले असून, विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला मिळालेली ही आंतरराष्ट्रीय मान्यता बारामतीच्या कृषी शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.