VIDEO : फूटपाथवर नाचवल्या बारबाला; पुण्यात नवरदेवाची वरात फूटपाथवर नाचवल्या बारबाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO : फूटपाथवर नाचवल्या बारबाला; पुण्यात नवरदेवाची वरात

VIDEO : फूटपाथवर नाचवल्या बारबाला; पुण्यात नवरदेवाची वरात

पुणे: कोरोनाची तिसरी लाट नुकतीच ओसरली आहे. त्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक सणसमारंभ यांना परवानगी मिळत आहे. याआधी कोरोनामुळे नाईट कर्फ्यू सुद्धा लागू करण्यात आला होता. मात्र, आता मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. असं असलं तरी याचा काहीसा गैरफायदा घेणारा एक प्रकार पुण्यामध्ये घडलेला दिसून येतोय. पुण्यातील सेनापती बापट रोड, वडारवाडी याठिकाणी एका लग्नाच्या मांडवामध्ये चक्क बारबाला नाचवल्या जात असल्याचा प्रकार घडला आहे. यातील काही व्यक्ती तृतीयपंथी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Bar Dancers performs on the road in pune)

हेही वाचा: Video: भरसभेत कार्यकर्त्याच्या पाया का पडले PM मोदी? वाचा कारण

विशेष म्हणजे हा लग्नाचा मांडव रस्त्यावरच असून मोठ्याने गाणी लावून बारबालांना नाचवलं जात आहे. तसेच त्यांच्यावर पैसे देखील उडवले जात आहेत. एकीकडे कोरोनाचे मुलभूत नियम आजही पाळणे बंधनकारक असताना या मांडवामध्येही एकही व्यक्ती मास्क अथवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाहीये. थेट अशाप्रकारे घरगुती कार्यक्रमामध्येच रस्त्यावर बारबाला नाचवण्याला पुणे पोलिस परवानगी देणार आहेत का? किंवा दिली आहे का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होतो आहे.

Web Title: Bargirls Dancing On The Footpath Grooms Wedding In Pune By Breaching The Corona Rules

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusPune News
go to top