esakal | बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया मधुमेहींसाठी जीवरक्षक
sakal

बोलून बातमी शोधा

बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया मधुमेहींसाठी जीवरक्षक

तज्ज्ञ काय म्हणतात?
लठ्ठपणा कमी करण्यासाठी किंवा मधुमेह नियंत्रणाचा उपाय म्हणून बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून प्रभावी ठरत आहेत. त्याची गरज आता वाढल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्‍टरांनी नोंदविले आहे. पण, अनलॉकच्या या पहिल्या टप्प्यात या रुग्णांवर उपचार करावे का, असा प्रश्‍न तज्ज्ञांना पडला आहे. पण, कोरोना पुढील काही महिने राहणार आहे. त्यामुळे मधुमेही आणि लठ्ठ रुग्णांच्या जिवाचा धोका कमी करण्यासाठी या शस्त्रक्रियेला मान्यता दिली आहे.

बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया मधुमेहींसाठी जीवरक्षक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या उद्रेकात जोखमीच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया प्रभावी उपाय असल्याचे जगमान्य होत आहे. लठ्ठ मधुमेही रुग्णांवरील शस्त्रक्रियेमुळे मृत्यूदर कमी होईल. त्यामुळे ही शस्त्रक्रिया जीवरक्षक असल्याची मोहोर ‘अमेरिकन सोसायटी फॉर मेटॅबोलिक ॲण्ड बॅरियाट्रिक सर्जरी’ने उमटवली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना उद्रेकाच्या काळात कोणत्या शस्त्रक्रिया अत्यावश्‍यक आणि कोणत्या शस्त्रक्रियांना पुढे ढकलता येऊ शकतात, यावर या सोसायटीमध्ये बहुमताने निर्णय घेण्यात आले. त्यात बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया अत्यावश्‍यक असून उशीर करून चालणार नाही, अशा प्रकारातील असल्याचेही या सोसायटीने नमूद केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जीवरक्षक कशी?  
लठ्ठपणा आणि त्यातून येणारा मधुमेह गेल्या दोन दशकात वेगाने वाढल्याचे दिसते. लठ्ठपणा आणि मधुमेह याचा थेट परिणाम शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. या विकारांमध्ये प्रतिकारक शक्ती कमी होते, हे वैद्यकशास्त्राने यापूर्वीच सिद्ध केले आहे.

आताच्या कोरोना उद्रेकातील मृत्यूदर कमी करण्यासाठी लठ्ठपणा आणि मधुमेह यांच्यावर प्राधान्याने प्रभावी उपाय करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे या शस्त्रक्रियेला जीवरक्षक म्हटले आहे. लठ्ठपणामुळे शरीराची त्वचा ताणली जाऊन त्याचे परिणाम दिसून येतात. तसेच, श्‍वासोच्छ्वासाचे आजार होण्याचे प्रमाण वाढते. अशा लठ्ठ रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याच्या उपचारातील गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. लॉकडाउनमध्ये रुग्णांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आणि ताणतणाव वाढले. त्यातून रुग्णांचे वजन वाढल्याचे दिसते. तसेच मधुमेहाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळे धोकाही वाढला आहे.

इतर आजार असलेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी बॅरियाट्रिक शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारू. ही शस्त्रक्रिया गरजेची असल्याने त्याला अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात येत आहे. त्यातून जोखमीच्या रुग्णांच्या जिवाचा धोका निश्‍चित कमी होईल. 
- डॉ. शशांक शहा, माजी अध्यक्ष, ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडिया

loading image