अवती भवती साठी

अवती भवती साठी
Published on

BAR26B13142
बार्शी : कामगार कल्याण मंडळाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्व. डॉ. भगवान नेने यांना अभिवादन करताना अधिकारी व कर्मचारी.
---
बार्शीच्या कॅन्सर हॉस्पिटलमधील महिलांचा सत्कार
बार्शी शहर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमधील महिला कामगारांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात कॅन्सर हॉस्पिटलचे संस्थापक स्व. डॉ. भगवान नेने व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी कामगारांचे मनोबल वाढविण्यासाठी डॉ. जयंत करंदीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मानवता हाच धर्म असून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी हिंगमिरे कॅन्सर प्रकल्प प्रमुख डॉ. संपदा कुलकर्णी, रोहित शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कामगार अधिकारी समाधान भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी केंद्राचे संचालक बाळासाहेब आंधळकर यांच्यासह राहुल ओहळ, गायत्री पाटील व उमा तांबे यांच्या सहकार्याने करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MI SAVITRIBAI JYOTIRAO PHULE
Dr. Jyoti Waghmare Highlights Impact of Phule Couple’s Thoughts
Dr. Jyoti Waghmare takes oath in Rajya Sabha in Savitribai Phule attire, holding the Constitution.
Action at Savitribai Phule Pune University Tech Head on Forced Leave
Marathi News Esakal
www.esakal.com