पहिल्याच दिवशी बार्शीत ४६ अर्जांची विक्री
पहिल्याच दिवशी बार्शीत
४६ उमेदवारी अर्जांची विक्री
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. १६ : बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद ६ गट आणि पंचायत समितीच्या १२ गणांसाठी निवडणूक होत आहे. या जागांसाठी शुक्रवारी (ता. १६) अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत ४६ अर्जांची विक्री झाली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणासाठी उपळाई (ठों) - ८, पांगरी - ७, पानगाव - १०, उपळे दुमाला - ५, मालवंडी - ८, शेळगाव (आर) - ८ या गटातून अशा पद्धतीने अर्जांची विक्री झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एफ. आर. शेख यांनी दिली. अर्ज भरण्याची शेवटची मुदत बुधवारपर्यंत (ता. २१) आहे.
तालुक्यात आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातच खरी लढत होणार असून, दोन्हीही गटांत इच्छुकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी दोन्ही गटांकडून कार्यकर्त्यांचे मेळावे देखील घेण्यात आले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी नेमके कोणाला तिकीट मिळणार, याकडे तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

