

रेल्वे परिषदेत बार्शीकरांनी मांडली गाऱ्हाणी
दादर येथे राज्यातील रेल्वे विकास व प्रलंबित मागण्यावर सविस्तर मंथन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २८ : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि राज्यातील रेल्वेच्या विकासाला गती देण्यासाठी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात महाराष्ट्र रेल्वे परिषद नुकतीच झाली. या परिषेद बार्शी येथील रेल्वे प्रवासी सेलने जिल्ह्यातील रेल्वे विकास व प्रलंबित मागण्यांवर सविस्तर मंथन करण्यात आले.
गतिमान महाराष्ट्र, समृद्ध कोकण हे महत्त्वपूर्ण ब्रीदवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत राज्यातील रेल्वे अभ्यासक, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांनी एकत्र येत प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर मंथन केले. यावेळी रेल्वे प्रवासी सेलच्या वतीने बार्शी व परिसरातील रेल्वे बाबतच्या मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी शैलेश वखारिया यांनी महाराष्ट्र राज्य स्तरीय एखादी रेल्वे प्रवासी संघटना स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला जेणे करून महाराष्ट्रातील सर्वच छोट्या मोठ्या शहराच्या मागण्या रेल्वे प्रशासनापुढे प्रभावीपणे मांडता येतील. या प्रस्तावाला उपस्थित सर्वच संघटनानी मान्यता दिली आहे.
...........................
रेल्वे प्रवासी सेलने केलेल्या मागण्या
१) बार्शी स्टेशन चा समावेश अमृत भारत योजनेमध्ये करावा
२) हरंगुळ - पुणे गाडी पूर्ववत पुणे स्टेशनला न्यावी
३) लातूर - पुणे इंटरसिटी, कोल्हापूर - बिदर, लातूर - मुंबई अजून एक ट्रेन या सर्व ट्रेन सुरू कराव्यात.
४) राज्यातील सर्व छोट्या मोठ्या संघटनांना बरोबर घेऊन स्तरीय एक शिखर रेल्वे संघटना स्थापन करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.