Barti
sakal
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५मध्ये उत्तीर्ण होऊन मुलाखतीस पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (बार्टी), पुणे यांच्याकडून मुलाखत परीक्षेच्या तयारीसाठी एकरकमी १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. राज्यातील पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीतर्फे करण्यात आले आहे.