Barti
sakal
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या ‘अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२५’ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे’तर्फे (बार्टी) मुलाखतीच्या तयारीसाठी एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या (एससी) पात्र उमेदवारांना प्रत्येकी पाच हजारांची एकरकमी मदत दिली जाईल.