
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) महाराष्ट्र लोकसेवा आयोग-अराजपत्रित गट-ब २०२४ ची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी एकरकमी दहा हजार रुपये अर्थसाह्य देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १० जुलैपर्यंत वाढविली आहे. यापूर्वी उमेदवारांना ३० जूनपर्यंत मुदत दिली होती.