
मार्केट यार्ड : पंजाब आणि हरियाना राज्याला अनेक दशकांनंतर आलेल्या महापुरामुळे तांदळाच्या पिकास मोठा फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान धानाच्या (भात) पिकाचे झाले आहे. बासमती तांदळाच्या उत्पादनात लक्षणीय घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिमाण निर्यात आणि दरवाढीवर होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.