बावड्याच्या केळीची मलेशिया, इराणला गोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bawada

बावड्याच्या केळीची मलेशिया, इराणला गोडी

बावडा : येथील केळीची सध्या मलेशिया, इराण, सौदी अरब या देशात निर्यात सुरू आहे. परदेशात निर्यातक्षम केळीला सध्या प्रती किलो सरासरी १५ ते १६ रुपयांचा भाव मिळत आहे. चांगला दर मिळत असल्याने बावडा येथील केळी उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सचिन काटकर, धनश्री काटकर या तरुण शेतकऱ्याने चार एकर क्षेत्रावर जी.नाईन व्हरायटी केळी पिकाची लागवड केली. ठिबकद्वारे विद्राव्य खते देत, (जैविक सेंद्रिय आणि रासायनिक) खतांचा समतोल राखल्याने दोघांनी प्रत्येक झाडाची आवश्यक काळजी घेत पिकाची आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन केल्याने पीक भरघोस आले आहे.

हेही वाचा: अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई मिळेल - खासदार सुळे

केळीच्या बागेत घड स्वच्छ करून ते बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग करून मलेशिया देशात सध्या पाठवणे सुरू आहे. भारतीय एक्सपोर्टर प्रशांत धसुरे, सौरभ मेहेर यांच्या कंपनीतर्फे सचिन काटकर यांच्या केळीचा हार्वेस्टिंग पाहण्यासाठी इराण येथून डॉ.नूर मोहम्मद हाजी परवेज आले आहेत. यावेळी शेतकरी सचिन काटकर यांचे अभिनंदन केले.

केळी फळबाग लागवडीसाठी तुकाराम घोगरे, संजय नायकुडे, काशिनाथ काटकर, रणजित माने यांचे मार्गदर्शन घेऊन या केळी बागेमध्ये चांगल्या प्रकारचे उत्पादन निघेल असा अंदाज केळी उत्पादक शेतकरी सचिन काटकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Pune Newsbananaagro