
पुणे : राज्यातील शासकीय, शासकीय अनुदानित, विनाअनुदानित खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये बीसीए आणि एमसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बुधवारपर्यंत (ता. १३) ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. या प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २३ ऑगस्टला जाहीर होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) दिली आहे.