esakal | जागरूक राहून करा इंटरनेटचा सदुपयोग : प्रा. प्रीती जैन
sakal

बोलून बातमी शोधा

Priti jain

जागरूक राहून करा इंटरनेटचा सदुपयोग : प्रा. प्रीती जैन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘इंटरनेटचा (Internet) जागरूक राहून सदुपयोग (good use) करायला हवा,’ असा सल्ला सायबर सिक्‍युरीटी तज्ज्ञ (Cyber Security Technician) प्रा. प्रीती जैन (Priti Jain) यांनी दिला. ‘तनिष्का व्यासपीठा’च्या वतीने ‘सोशल मीडिया (Social Media) वापरतानाची काळजी’ या विषयावर नुकताच वेबिनार (Webinar) आयोजित करण्यात आला होता. (Be aware and make good use of the internet Priti Jain)

ऑनलाईन फसवणुकीच्या घटना टाळता याव्यात, या उद्देशाने तनिष्का सदस्यांसाठी वेबिनार आयोजित केला होता. प्रा. जैन म्हणाल्या, ‘सध्याचा जमाना हा ऑनलाइनचा आहे. त्यामुळे विविध वेबसाईटसवरून खरेदी करणे, सतत फेसबुकसारख्या सोशल मीडियावर अपडेट राहणे ही आता आपली जीवनशैली झाली आहे. ऑनलाइन माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी आपण घेत असलेली काळजी हीच आपली कवच कुंडले आहेत. आपला पासवर्ड हा आपल्या टुथब्रश सारखा असतो. तो कधीच कुणाला शेअर करायचा नसतो.’

हेही वाचा: पुणे: दुसऱ्या डोससाठी पात्र नागरिक उपलब्ध नसल्यास कोणाला मिळणार लस?

यावेळी प्रा. जैन यांनी योग्य सिक्‍युरीटी सेटींग आणि व्हॉट्‌स ॲप हॅकींग, फोटोंचा दुरूपयोग, वैयक्तिक माहितीची चोरी टाळण्यासाठीच्या टिप्सही दिल्या.

‘तनिष्का’च्या पेजवर पाहा वेबिनार..!

या वेबिनारच्या माध्यमातून प्रा. प्रीती जैन यांनी रंजक पद्धतीने कथांच्या स्वरूपात तनिष्का सदस्यांना नवीन माहिती दिली. हा संपूर्ण वेबिनार ‘तनिष्का व्यासपीठा’च्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. तो पाहण्यासाठी सोबत दिलेला क्‍यूआर कोड स्कॅन करा.