Pune News : सेवा, करुणा आणि अध्यात्माचा दीप मावळला; जैन धर्मातील पहिल्या महिला आचार्य चंदनाजी यांचे निधन

जैन धर्मातील पहिल्या महिला आचार्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आचार्य चंदनाजी (ताई महाराज) यांचे बुधवारी (ता. २२) सकाळी १०:५० वाजता निधन झाले.
aacharya chandnaji maharaj

aacharya chandnaji maharaj

sakal

Updated on

पुणे - जैन धर्मातील पहिल्या महिला आचार्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आचार्य चंदनाजी (ताई महाराज) यांचे बुधवारी (ता. २२) सकाळी १०:५० वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच जैन समाजासह देशभरातील सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सेवा, करुणा आणि समाजहिताचा संदेश देत आयुष्यभर कार्य करणाऱ्या चंदनाजी महाराजांनी एक धर्मगुरू म्हणूनच नव्हे, तर द्रष्ट्या समाजसुधारक म्हणूनही ठसा उमटवला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com