सासवड रोडकडून येणाऱ्या पुलाचे तुटले हाईड बॅरिअरर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bearing repair of Hadapsar flyover broken barriers of bridge Saswad Road pune

सासवड रोडकडून येणाऱ्या पुलाचे तुटले हाईड बॅरिअरर्स

हडपसर : येथील उड्डाणपुलाच्या दुरूस्तीनंतर गेली दोन महिन्यांपासून पुलाच्या तीनही मार्गावर लावलेली हाईड बॅरिअरर्स वाहनांमुळे वारंवार तुटण्याच्या घटना घडत आहेत. आज पाहटे अवजड वाहनाने धडक दिल्याने सासवड रस्त्याकडून येणाऱ्या पुलावरील हाईड बॅरिअरर्स तुटून दोन तुकडे झाले आहेत. याच तुटलेल्या बॅरिअरर्स खालून हलकी वाहने प्रवास करीत असल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. हडपसर उड्डाणपुलाच्या बेअरिंग दुरुस्तीनंतर दोन महिन्यांपूर्वी पुलावरील वाहतूक हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात आली आहे. त्याचवेळी अवजड वाहतूक मात्र पुलाखालून वळविण्यात आली आहे.

अवजड वाहने उड्डाणपुलावरुन जाऊ नये म्हणून पुलाच्या तीनही मार्गावर हाईड बॅरिअरर्स लावण्यात आले आहेत. आता याच हाईड बॅरियर्समुळे येथे मागील अपघातांची मालिका सुरू आहे. तब्बल पंधरापेक्षा अधिक वेळा या ठिकाणीच अपघात झाले आहेत. वेगवेगळ्या उपाययोजना करूनही अपघातांची मालिका काही संपताना दिसत नाही. मागील आठवड्यात हडपसरहून सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील हाईड बॅरियर्स तुटलेले आहे. या मार्गाने अनेक जड वाहने प्रवास करीत आहेत. आज पहाटे सासवड रोडवरील हाईड बॅरियर्सला जड वाहनाने धडक दिली. या धडकेत लोखंडी बॅरिअरर्सचे दोन तुकडे झाले आहेत. त्यानंतरही सकाळी या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांकडून तुटलेल्या बॅरिअरर्सची पर्वा न करता वाहतूक सुरूच होती.

"तुटलेला हाइट बॅरिअर तातडीने दुरुस्त केला जात आहे. अवजड वाहनांनी येथून प्रवास करू नये म्हणून वाहनचालकांना हाईड बॅरियर्सच्या उंचीबाबत सूचना फलक, रेडियमच्या पट्टय़ा व ब्लिंक होणारे दिवे लावलेले आहेत. वाहनांचा वेग मंदावण्यासाठी गतीरोधकही बसविले आहेत. वाहनचालकांनी सूचनांचे पालन करावे.'

इंद्रभान रणदिवे महापालिका कार्यकारी अभियंता, महानगरपालिका

Web Title: Bearing Repair Of Hadapsar Flyover Broken Barriers Of Bridge Saswad Road Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top