वाघोली : भर रस्त्यावर मारहाणीचा राडा..

सी सी टीव्हीत घटना कैद
fighting
fighting sakal

वाघोली : वाघोलीतील वाघोली - केसनंद रस्त्यावर बालाजी नगर परिसरात मुलासह पत्नीला पती व सासूने बेदम मारहाण केली. पती दारूच्या नशेत होता.एवढेच नाही तर त्याने नशेत आजूबाजूच्या वाहनांच्या काचा व पदपथावरील दिवे फोडले. सुमारे दीड तास हा राडा रस्त्यावर सुरू होता. सी सी टीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसानी एन सी दाखल केली आहे.बालाजी नगर परिसरात हे कुटूंब राहते. सासू सासरे, मुलगा व त्याची पत्नी व त्यांना एक मुलगा एवढे सदस्य त्या घरात राहतात. तो खाजगी वाहनावर चालकाचे काम करीत असल्याचे समजते. (Intoxicated person broke the vehicle glass and footpath lights of the surrounding )

fighting
भारतात 'बूस्टर डोस' कधी आणि कुणाला मिळणार?

दारू पिऊन आलेल्या नवऱ्याने आपल्या पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणी मुळे ती महिला बाहेर पळाली. यानंतर रस्त्यावरच राडा सुरू झाला. सासूने हा प्रकार थांबविण्याऐवजी सुनेलाच दादागिरी सुरू केली. तिच्याशीच ती झटापट करत होती. मारहाणीमुळे ती इकडे तिकडे धावाधाव करीत होती. हा प्रकार सुरू असताना अनेक बघे बघत होते. मात्र कोणीही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला नाही. काही वेळाने त्या तरुणाने घराच्या टेरेस वर जाऊन दगडफेक सुरू केली. केवळ पत्नीलाच नाही तर मुलालाही त्याने मारहाण केली. या मारहाणीत पत्नी रक्त बंबाळ झाल्याचेही प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले. टेम्पोवर दगड फेक करून दुसऱ्याच्या मालकीच्या टेम्पोच्या काचाही त्याने फोडल्या.(Many were watching But no one tried to stop that fight )

fighting
सातारा : वाठारमधे वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

तसेच पद पथावरील दिवे फोडले. काहींनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांनी त्यांना जुमानले नाही. अखेर तेथील एकाने पोलीसांशी संपर्क साधला. लोणीकंद पोलीस व 100 नंबर वर संपर्क साधून सुरू असलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस आले. त्या तरुणाला समजावत त्यांनी त्याला दुचाकीवरुन पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर ती महिलाही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली. मात्र तिची केवळ एन सी नोंदविण्यात आल्याचे कळते. सासू सासर्यालाही पोलीसानी पोलीस ठाण्यात बोलविले होते. मात्र रात्री उशिरा त्यांना सोडून देण्यात आल्याचे कळते. त्या महिलेला एफ आय आर नोंदवायची होती. असे नागरिक सांगत होते. मात्र एन सी का नोंदविली हे कळले नाही. असा प्रश्नही नागरिकांनी उपस्तीत केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com