विद्युत रोषणाईमुळे खुलले आगाखान पॅलेसचे सौंदर्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 जानेवारी 2020

आगाखान पॅलेसला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा 
ब्रिटिश सरकारने ९ ऑगस्ट १९४२ मध्ये ‘चले जाव’ चळवळ दडपून टाकण्यासाठी महात्मा गांधींना अटक करून आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले. त्यांच्या सोबत कस्तुरबा गांधी, त्यांचे खासगी सचिव महादेवभाई देसाई, सरोजीनी नायडू होत्या. अटक केल्यानंतर सहाच दिवसांत म्हणजे १५ ऑगस्ट १९४२ मध्ये महादेवभाई देसाई यांचे निधन झाले. तर २२ प्रिन्स करीम शहा आगाखान यांनी १९७९ मध्ये आगाखान पॅलेस महाराष्ट्र सरकारला दान दिले. त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आल्यानंतर त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला आहे.

येरवडा - तब्बल चाळीस वर्षांनंतर ‘आगाखान पॅलेस’चे नूतनीकरण व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक व पुणेकरांना रात्री नऊपर्यंत आगाखान पॅलेस खुले ठेवण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय पुरातत्त्व विभागाने पॅलेसवर सुशोभीकरण व कायमस्वरूपी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. पॅलेसमध्ये बारा कक्ष तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये पहिल्या कक्षात दुसरे महायुद्ध आणि त्याचा भारत देशावर झालेला परिणाम, क्रिप्स मिशन, युद्धासंदर्भात महात्मा गांधीजींची स्पष्ट भूमिका दाखविण्यात आली आहे. 

पुण्यात देशातील सर्वांत उंच बिल्डींगवर फडकणार 'तिरंगा'!

दुसऱ्या कक्षात ‘‘भारत छोडो’ आंदोलन, करेंगे या मरेंगे, महात्मा गांधीजींची आगाखान पॅलेसमधील नजरकैद, तिसऱ्या कक्षात भारत छोडो आंदोलनाचा प्रसार, सात विद्यार्थ्यांचे बलिदान, गुप्त रेडिओची सुरुवात, गुप्त रेडिओ चालविणारे स्वातंत्र्य सैनिक या बद्दल माहिती देण्यात आली आहे. चौथ्या कक्षात महात्मा गांधी यांचे उपोषण व घटनाक्रम, पाचव्या कक्षात नजरकैदेत असताना बा-बापू यांनी वापरलेल्या वस्तू ठेवल्या आहेत.

केंद्र सरकारने आगाखान पॅलेसची रंगरंगोटी व कायमस्वरूपी आकर्षण विद्युत रोषणाई केली आहे. सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आगाखान पॅलेसमधील विद्युत रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांना खुले ठेवण्यात आले आहे.
- गजानन मांडावले, सहायक संरक्षक, भारतीय पुरातत्व विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The beauty of the Agakhan Palace opened with electric light