पशुधन घटतय

Animal-Wealth
Animal-Wealth

बेबड ओहोळ - जमिनींची वाढलेली विक्री व पेटणारे वणवे यामुळे गेल्या पंधरा वर्षांत मावळ तालुक्‍यातील पशुधन सहा हजारांनी कमी झाले आहे. पशुधन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती व वणव्यांसंदर्भात उपाययोजना करण्याची गरज आहे.  मावळ तालुका शेती व भात पिकासाठी परिचित आहे. मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस व उपलब्ध चारा पशुधनासाठी उपयुक्त ठरतो. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत तालुक्‍यातील पशुधन जवळपास सहा हजारांनी कमी झाले आहे. दुग्ध व्यवसायही कमी झाला आहे. 

पशुधन घटण्याची कारणे 
वणव्यांमुळे ८० टक्के चारा नष्ट
दुकानातील पशुखाद्य न परवडणारे
जमिनींच्या विक्रीत वाढ
वाढते औद्योगिकीकरण

लागणारे वणवे, जमिनीची विक्री यामुळे पशुधनात मोठा फरक पडला आहे. पशुधन वाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
- दीपक राक्षे, पर्यवेक्षक अधिकारी, मावळ

गावांनुसार पशुधन
गावे       १५ वर्षांपूर्वी       आता

सोमाटणे       ३९१       १२०
शिरगाव       ६१०       ३६५
गहुंजे       ११४८       ४०५
वराळे       ५८८       ४१८
इंदोरी       २८३०       १२०८
मावळ तालुका       ६२,३४३       ५६,१९८

तरुणाई शेतीकडे का?
शेतीची आवड
जोडधंदा
नवीन तंत्रज्ञानाचा वापर
दुसरा पर्याय नाही

धामणेत पशुधनात वाढ
धामणे ग्रामस्थांनी परंपरागत दुग्धव्यवसाय जपला आहे. १०१७ वरून तेथील पशुधन १२२० झाले आहे. येथील शेतकऱ्यांनी शेती जपली असून, नवीन पिढीलाही शेती व पशुधनाबाबत योग्य दिशा दिली आहे. आज येथील तरुणही शेतीमध्ये गुंतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com