कोरोना बाधितांनो, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याआधी 'ही' बातमी वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beds are not available for needy corona infected patients in pune

कोरोना बाधित असला तरी, केवळ बक्कळ पैसा अथवा मेडीक्लेम आहे म्हणुन अॅडमिट होऊ नका.. ...कारण गंभीर लक्षणे नसतानाही तुमच्या नाहक अॅडमिट होण्यामुळे अनेक कोरोना बाधित रुग्ण मृत्युच्या दारात उभे....  

कोरोना बाधितांनो, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याआधी 'ही' बातमी वाचा

लोणी काळभोर (पुणे)- कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांनो केवळ तुमच्याकडे बक्कळ पैसा आहे अथवा तुमचा मेडीक्लेम आहे म्हणुन अॅडमिट होऊ नका.. ...कारण कोरोनाची लक्षणे नसतानांही केवळ कोणाच्यातरी सांगण्यावरुन तुमच्या नाहक अॅडमिट होण्यामुळे, गरजुंना बेड उपलब्ध होत नसल्याने हजारो कोरोना बाधित रुग्ण उपचाराअभावी मृत्युच्या दारात उभे आहेत.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर जर तुम्हाला श्वास घेतांना त्रास होत असेल.. ताप येत असेल... चालतांना दम लागतोय, सर्दी भरपुर आहे अथवा मधुमेहाने त्रस्त आहात अथवा इतर कोणत्याही गंभीर यापुर्वीच त्रस्त असाल तरच रुग्नालात अॅडमिट व्हा... कारण कोणतेही लक्षणे नसतांनाही, केवळ काळजीपोटी अॅडमिट झालेल्या रुग्णांच्यामुळे पुणे शहर व जिल्हातील सत्तर टक्काहुन अधिक बेड भरुन गेले आहेत. तर दुसरीकडे तीस टक्क्याहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांना गंभीर लक्षणे जाणवत असतानाही, बेड अभावी त्यांच्यावर उपचार होत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. 

पहिल्या बायकोचा संशयास्पद मृत्यू, दूसरीचा पैशांसाठी छळ तर तिसरीला

दरम्यान कोरोना बाधित रुग्णांच्यापैकी सत्तर टक्के रुग्णांना कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे जाणवत नसतांनाही, केवळ काळजी पोटी अथवा कोणाच्या तरी सांगण्यावरुन बहुसंख्य रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत ही बाब खरी आहे असे मत हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली असली तरी, जर श्वास घेतांना त्रास होत असेल.. ताप येत असेल... चालतांना दम लागत असेल अथवा मधुमेहाने त्रश्त असेल अथवा इतर कोणत्याही गंभीर आजार असेल अशाच रुग्णांनी तात्काळ उपचारासाठी रुग्नालयात अ्ॅडमिट होण्याची गरज आहे असेही डॉ. सचिन खरात यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पहिल्या बायकोचा संशयास्पद मृत्यू, दूसरीचा पैशांसाठी छळ तर तिसरीला 

जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातील एका वरीष्ठ वैधकिय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यात सध्या अकराशेहुन अधिक कोरोनाचे एक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या तीस टक्के रुग्णांच्यापैकी कोणाला श्वास घेतांना त्रास होतोय, तर कोणाचा ताप सतत वाढतोय, तर कोणाला चालतांना दम लागतोय, कांहीना सर्दी भरपुर आहे तर कांही मधुमेहाने त्रस्त आहेत. तर कांही रुग्ण पुर्वीपासुन इतर कांही रोगांना त्रस्त आहेत. मात्र उर्वरीत सत्तर टक्के रुग्ण मात्र केवळ कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली म्हणुन जवळच्या खाजगी रुग्नालयात अॅडमिट झाले आहेत. केवळ कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली म्हणुन रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिचवड व ग्रामीण भागील सरकारी व खाजगी रुग्णालये ओसंडुन वाहत आहेत. तर दुसरीकडे खरोखरच उपचाराची गरज असणारे रुग्ण मात्र बेड अभावी मरणाच्या दारात बेडची वाट पहात तडफडत आहेत.

याबाबत अधिक माहिती देतांना हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात म्हणाले, कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली म्हणुन रुग्णालयात दाखल होण्याची कांहीही गरज नाही. रुग्णांस खऱोखरच कांही गंभीर लक्षणे जाणवत असतील तरच तज्ञांच्या सल्ल्याने रुग्नालयात दाखल व्हावे अशी आमची कळकळीची विनंती आहे. सध्या बहुतांश रुग्ण केवळ भितीपोटी व कांहींच्या चुकींच्या सल्ल्यामुळे दाखल होत आहेत ही बाब खरी आहे. कोरोनाटी टेस्ट पॉझिटीव्ह आली.. मेडीक्लेम आहे, असेतसेही हफ्ते भरतोच ना मग व्हा अॅडमिट या विचारातुन अनेक जण रुग्णालयात दाखल होत आहेत. ही बाब खरोखरच गंभीर आहे. खाजगी रुग्णालयात जाऊन पहाणी केल्यास, सत्तर टक्कयाहुन अधिक रुग्ण वरील विचारांचे आढळुन येतील. मात्र अशा विचारामुळे अनेकांना बेड उपलब्द होत नाहीत. तसेच उपचारांची गरज असतांनाही बेड अभावी रुग्णालयांना उपचार करता येत नाहीत. यामुळे नागरीकांनी गरज असले तरच तज्ञांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात अॅडमिट व्हावे अशी कळकळची विनंती डॉ. सचिन खरात यांनी केली आहे.

Web Title: Beds Are Not Available Needy Corona Infected Patients Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top