

जुन्या वादातून
बीडजवळ गोळीबार
बीड, ता. १२ : जुन्या वादाच्या कारणावरून शहरालगतच्या इमामपूर रस्ता परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ गोळीबाराची घटना घडली. ‘‘तू आमच्याकडे काय बघतोस?’’ असा जाब विचारत झालेल्या बाचाबाचीनंतर थेट पिस्तूल काढून तीन फैरी झाडल्या. या हल्ल्यात फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी एका आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. तक्रारदार शेख महंमद साद (वय २२, रा.बीड) मंगळवारी रात्री मित्रासह इमामपूर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ थांबले होते. यावेळी सय्यद साद याने ‘तू आमच्याकडे का बघतोस’ असे म्हणत जुन्या वादाचा राग धरून त्यांना कानाखाली मारली. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर सय्यद सादने मामा सफवान खान मोहम्मद खान (रा. पेठ बीड) याला फोन करून बोलावून घेतले. सफवान खान टोळक्यासह हातात लाठ्या-काठ्या आणि पिस्तूल घेऊन घटनास्थळी धडकला. घटनास्थळी पोचताच सफवान खानने जिवे मारण्याच्या हेतूने पिस्तुलातून तक्रारदाराच्या दिशेने एकापाठोपाठ एक तीन फैरी झाडल्या. सुदैवाने गोळ्या हुकल्याने तक्रारदार वाचले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.