Medical Student Ends Life Over Study Stress: भोपाळच्या एम्स रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या बीड येथील एका तरुणाने पुण्यातील वानवडी परिसरात गळा चिरून स्वत:चं जीवन संपवलं आहे. उत्कर्ष महादेव हिंगणे असं या तरुणाचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हाट्सअपवर सुसाईड नोट लिहित आत्महत्येचं कारणही सांगितलं आहे.