

Rural Pune Faces Alarming Drop in Child Sex Ratio Amid Illegal Gender Testing Practices
sakal
-रमेश वत्रे
केडगाव : जन्माला येण्यापूर्वीच जिचा गुन्हा ठरतो, त्या समाजाला प्रगत म्हणावे का? अजून जगही न पाहिलेल्या अनेक कळ्या केवळ ‘मुलगी’ असल्याच्या संशयावरून गर्भातच खुडल्या जात आहेत. आईच्या कुशीला मुकलेल्या याच कळ्यांची वेदनादायी कहाणी पुणे जिल्ह्यातील लिंग गुणोत्तराच्या आकडेवारीतून समोर येत आहे.