esakal | प्रेरणाच्या वतीने सीमेवरील जवानांना दिवाळी
sakal

बोलून बातमी शोधा

On behalf of Prerna Association for the Blind, citizens greeted the activists who went to celebrate Diwali with Indian soldiers at Sadaki Border in Punjab

गंगा व्हिलेज हांडेवाडी रोड येथील प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंडस या संस्थेच्या वतीने 'वीर जवानांसोबत दिवाळी' हा उपक्रम गेली सतरा वर्षापासून राबविण्यात येतो. यावर्षी संस्थेची सहा सदस्यीय समिती पंजाबमधील सादकी बोर्डरवर भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी रवाना झाली आहे. त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या. 

प्रेरणाच्या वतीने सीमेवरील जवानांना दिवाळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मांजरी (पुणे) : कोरोनाकाळात सुरक्षित राहण्यासाठी आपण घरी राहणं पसंत करतोय, पण सीमेवरील सैनिक अशा परिस्थितीतही घरापासून दूर असून आपल्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावत आहेत. त्यामुळे या संकटकाळातील त्यांचे योगदान अधिकच वंदनीय आहे. त्यांचे स्मरण आणि सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानायला हवी, अशी भावना ज्ञानप्रबोधिनी डी.एड.कॉलेजच्या प्राचार्या उज्वला सावंत यांनी व्यक्त केली. 

गंगा व्हिलेज हांडेवाडी रोड येथील प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंडस या संस्थेच्या वतीने 'वीर जवानांसोबत दिवाळी' हा उपक्रम गेली सतरा वर्षापासून राबविण्यात येतो. यावर्षी संस्थेची सहा सदस्यीय समिती पंजाबमधील सादकी बोर्डरवर भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी रवाना झाली आहे. त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

'प्रेरणा' चे अंध बांधव दरवर्षी सीमेवरील जवानांच्या सोबत दिवाळी साजरी करतात. यावर्षीही प्रेरणाची सहा सदस्यीय टीम पंजाब मधील सादकी बोर्डरवर भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यासाठी पुण्यातून संस्थेचे सचिव सतीश नवले यांच्यासह सतीश हनुमंत जोशी, कुळदीपक प्रशाद, प्रवीण काच्छवा हे चार दिव्यांग पदाधिकारी तसेच आसिफ मुलाणी व माजी सैनिक उल्हास कुलकर्णी हे डोळस कार्यकर्ते मदतनीस म्हणून या समितीत सहभागी झाले आहेत.

त्यांना निरोप देण्यासाठी गंगा व्हिलेज, हडपसर येथे कार्यक्रम आयोजित केला होता. संस्थेचे संस्थापक दिलावर शेख, आबेदा शेख, नाझीम शेख, दिलावर मुलाणी, शब्बीर पठाण, मुहम्मद पानसरे, राजू गायकवाड, गणेश वाडकर आदी यावेळी उपस्थित होते. त्यांनी या समितीला शुभेच्छा दिल्या.