esakal | Vidhan Sabha 2019 : १ लाखापेक्षा जास्ती मताधिक्याने आमदार तापकीर यांचा एकतर्फी विजय; कार्यकर्त्यांचा विश्वास
sakal

बोलून बातमी शोधा

bhimrao Tapkir.jpg

Vidhan Sabha 2019 : खडकवासला : ''केंद्र, राज्य सरकारने मागील पाच वर्षात राबविलेल्या ध्येय-धोरण व विकासाच्या कामगिरीवर जनतेचा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी खडकवासला मतदार संघात महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकजूट दाखवून प्रचार केला. विरोधी उमेदवारावर ६५ हजारांचे मताधिक्य मिळवले. आता विधानसभेच्या वेळेस महायुतीचे सर्व घटक एकजुटीने, एकदिलाने, स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन प्रचार केला. लोकसभेची मताधिक्याची पुनरावृत्ती तर होईलच महायुतीचे उमेदवार आमदार भीमराव तापकीर यांचा एकतर्फी विजय होऊन एक लाखापेक्षा जास्तीचे मताधिक्य मिळवीत हॅट्ट्रिक होणार आहे. ''असा विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Vidhan Sabha 2019 : १ लाखापेक्षा जास्ती मताधिक्याने आमदार तापकीर यांचा एकतर्फी विजय; कार्यकर्त्यांचा विश्वास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : खडकवासला : ''केंद्र, राज्य सरकारने मागील पाच वर्षात राबविलेल्या ध्येय-धोरण व विकासाच्या कामगिरीवर जनतेचा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी खडकवासला मतदार संघात महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकजूट दाखवून प्रचार केला. विरोधी उमेदवारावर ६५ हजारांचे मताधिक्य मिळवले. आता विधानसभेच्या वेळेस महायुतीचे सर्व घटक एकजुटीने, एकदिलाने, स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन प्रचार केला. लोकसभेची मताधिक्याची पुनरावृत्ती तर होईलच महायुतीचे उमेदवार आमदार भीमराव तापकीर यांचा एकतर्फी विजय होऊन एक लाखापेक्षा जास्तीचे मताधिक्य मिळवीत हॅट्ट्रिक होणार आहे. ''असा विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

बालाजी नगर, राजीव गांधी नगर, लेक टाऊन शिप परिसरसातून पदयात्रा काढुन मतदारांशी संपर्क साधला. त्यांच्या सोबत, राणी भोसले, वर्षा तापकीर, मनीषा कदम, रुपाली धाडवे, बाळासाहेब ओसवाल, बळी निंबाळकर, काका कुलकर्णी,  सचिन पासलकर, सुशांत खिरीड, दिगंबर डवरी, दिनेश उर्फ पिंटू धाडवे, रायबा भोसले, शिवाजी धनकवडे, जितेंद्र कोंढरे, विकास लवटे, अमोल म्हस्के, अमोल वागसकर, सतीश अर्जुन, शंकर भोकसे, राजाभाऊ पासलकर यांच्यासह अनेक महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

यावेळी बोलताना उमेदवार आमदार भीमराव तापकीर म्हणाले की, 'केंद्र व राज्य सरकार, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास, नगर विकास, जिल्हा नियोजन, पीएमआरडीए जलयुक्त शिवार यासारख्या विभागातून सत्ताधारी आमदार असल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी मला मिळाला.केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यामुळे राज्यात देखील पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघातून देखील महायुतीचा उमेदवार म्हणून मला ही संधी द्या. सत्ताधारी पक्षातील आमदार असल्यास निधीची कधीच कमतरता पडत नाही. मागील वर्षी 1280 कोटी रुपयांचा निधी आणता आला. अनेक विकास कामे पूर्ण झाली असून काही विकास कामे सुरू आहेत. परिणामी मतदार संघाची कामगिरी प्रगती पथावर आहे. मतदार संघाची कामगिरी आता प्रगतीपथावर आहे. पाच वर्षात मतदार संघाचा कायापालट शक्य नसतो. उर्वरित कामांना जास्तीचा निधी व ती पूर्ण करण्यासाठी जनतेने पुन्हा मला संधी द्यावी.''

''मतदार संघात मेट्रोची कामे, रिंगरोड, कचरा व्यवस्थापन, सिंहगड, खडकवासला चौपाटी, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच मतदार संघाचा गतिमान व सर्वांगीण विकास करण्यासाठी मी यंदाही कटिबद्ध राहील. 

खडकवासला मतदार संघातून शांत, संयमी, प्रामाणिक, अभ्यासू उमेदवार आमदार भीमराव तापकीर यांना विजयी करा'' असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार गिरीश बापट यांनी व्हिडिओ  मतदारांना केले आहे.
 
loading image