esakal | प्रेयसीने लग्ननास नकार; प्रियकराने मित्रांना पाठविले अश्‍लिल व्हिडीओ
sakal

बोलून बातमी शोधा

अश्‍लिल व्हिडीओ

प्रेयसीचा लग्नास नकार; प्रियकराने मित्रांना पाठविले अश्‍लिल व्हिडीओ

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पुणे : अल्पवयीन मुलीसमवेत शारिरीक संबंध ठेवून तरुणाने त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. मुलीने लग्नास नकार दिल्यानंतर तेच व्हिडीओ मित्रांना पाठवून मुलीची बदनामी करणाऱ्या प्रियकराडस येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

हेही वाचा: धक्कादायक,जातपंचायतीकडून संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार;पाहा व्हिडिओ

निलेश सुभाष शेंडगे (वय 25, रा. लोहियानगर) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय मुलीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना ऑक्‍टोबर 2018 ते 30 ऑगस्ट 2021 दरम्यान घडली.

हेही वाचा: इंदापूर : समर्थकांमध्ये श्रेयवादावरुन कलगीतुरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी हि अल्पवयीन असताना आरोपी निलेश शेंडगे याने तिच्याशी प्रेमाचा बहाणा करीत तिच्याशी शारिरीक संबंध ठेवला. तिला वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध मित्रांचे घर व अन्य ठिकाणी नेऊन शारिरीक संबंध निर्माण केले. त्याचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरणही केले. दरम्यान, या संबंधातून मुलगी गर्भवती राहिल्यानंतर त्याने त्याच्या बहिणीच्या मदतीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिने त्याच्यासमवेत लग्न करण्यास नकार दिला. या रागातून शेंडगे याने फिर्यादी रहात असलेल्या ठिकाणच्या मुलांच्या मोबाईलवर तिच्यासमवेतचे व्हिडिओ चित्रीकरण पाठवून तिची बदनामी केली. फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यास तत्काळ अटक केली.

loading image
go to top