esakal | इंदापूर : समर्थकांमध्ये श्रेयवादावरुन कलगीतुरा
sakal

बोलून बातमी शोधा

indapur

इंदापूर : समर्थकांमध्ये श्रेयवादावरुन कलगीतुरा

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : इंदापूर नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागताच राज्य मंत्री दत्तात्रय भरणे तसेच भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांचे काँग्रेस समर्थक यांच्यामध्ये श्रेयवादावरून कलगीतुरा रंगला आहे. एकीकडे मंत्री भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील व त्यांचे समर्थक तथा नगराध्यक्षा अंकिता शहा, मुकुंद शहा व भरत शहा यांच्यातील शीतयुद्ध संपण्याची चिन्हे नाहीत त्यामुळे ऐन नगरपरिषद निवडणूक तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी संकेत आहेत.

हेही वाचा: अफगाणिस्तानात तालिबान उद्याच करणार सत्ता स्थापन?

त्या पार्श्वभूमीवर शहर कसब्यातील विकास कामावरून नगरपरिषद सत्ताधारी गट नेते कैलास कदम व माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शहर कसब्यात नगरपरिषदेने केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय राष्ट्रवादीकाँग्रेस घेत आहे. माजी सहकार मंत्रीहर्षवर्धनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी जिल्हा नियोजन समितीकडे केलेल्या प्रयत्नातून नगरसेविका मीना मोमीन व आपण स्वतः केलेल्या पाठपुराव्याने नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा अंतर्गत प्रभाग क्रमांक ६ मधील कामांसाठी जवळपास ६० लाख रूपयांचा निधी मंजूर करून आणला.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रामोशी गल्लीमध्ये विविध कामासाठी ३४ लाख रुपयांचा निधी पाठपुरावाकरूनआणला. सदर कामांच्या निविदा मंजूर असून काम सुरू करण्याचे आदेश देण्यापूर्वीच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सदरकामांचे फुकट श्रेयघेण्याच्या हेतूने उदघाटन केले.

हेही वाचा: मृत्यूसंदर्भातील सिद्धार्थचं 'ते' जुनं ट्विट पुन्हा व्हायरल

राष्ट्रवादी नेत्यांनीकेलेल्या कामांचे श्रेय नक्की घ्यावे मात्र रडीचा डाव करू नये असा आरोप कैलास कदम यांनी केला. तर कसब्यातील कामेराज्यमंत्रीदत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी शहर विकासासाठी दिलेल्या ३० कोटी रूपयातून सुरू आहे. माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, सुरेश गवळी,वसंत मालुंजकर,प्रा.अशोक मखरे, दादासाहेब सोनवणे तसेच आपण स्वतः पाठपुरावाकरून हा निधी मिळवला आहे.त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या कामात खोटे बोलून जनतेची दिशाभूल करू नये. रामोशी गल्लीतीलगटारी व रस्त्याचे भूमिपूजन दोन वर्षांपूर्वी झालेमात्र अद्याप काम झाले नाही. नगरपरिषदविकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने गटनेते वैफल्यग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांनी बाष्कळ बडबड करू नये असा सल्ला धनंजय बाब्रस यांनी दिला. त्यामुळे नगरपरिषद निवडणूकी साठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली असून कोण कोणाचा राजकीय मित्र व शत्रू हे कळण्यास वेळ लागणार आहे. मात्र सध्याच्या हालचाली पाहता ही निवडणूक चौरंगी होण्याची चिन्हे आहेत.

loading image
go to top