
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
चंद्रपूर जिल्ह्यात असणारे भद्रावती हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. अनेक पर्यटक विदर्भातील नागपूर, चंद्रपूर अशा ठिकाणी येऊन नेहमीच्या ठिकाणांना भेट देऊन परत जातात; परंतु अनेक अपरिचित पण महत्त्वपूर्ण ठिकाणे पाहत नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीत प्रागैतिहासिक काळापासूनच ते मध्ययुगीन काळापर्यंतचे अनेक पुरावे इतिहास अभ्यासकांना सापडलेत. या भागात असलेला किल्ला, मंदिरे आणि लेणी याचीच साक्ष देत उभे आहेत. महाराष्ट्रात फारच थोडी गावे अशी आहेत, की जी इतिहास, पर्यटन यांनी भरगच्च आहेत. अशापैकीच हे एक गाव.