Ambegaon Wildfire: आंबेगावातील भागडेश्वर डोंगराला भीषण आग; १५०-२०० एकर वनक्षेत्र भस्मसात, जैवविविधतेचे अपरिमित नुकसान

भागडेश्वर डोंगरावरील १५०-२०० एकर वनक्षेत्र भस्मसात; दुर्मिळ वनौषधी, पशू-पक्ष्यांचे मोठे पर्यावरणीय नुकसान
गांजवेवाडी(ता.आंबेगाव) येथील भागडेश्वर डोंगराला सोमवारी दुपारी भीषण आग लागली.

गांजवेवाडी(ता.आंबेगाव) येथील भागडेश्वर डोंगराला सोमवारी दुपारी भीषण आग लागली.

Sakal

Updated on

निरगुडसर : आंबेगाव तालुक्यातील गांजवेवाडी येथील भागडेश्वर डोंगराला सोमवार(ता.१३)रोजी दुपारी भीषण आग लागली.या आगीत सुमारे १५० ते २०० एकर वनक्षेत्र जळून खाक झाले असून,डोंगरावरील अफाट जैवविविधतेचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.कडक उन्हाळा आणि सोसाट्याचा वारा यामुळे आगीने रौद्र रूप धारण केल्याने वनविभागाची मोठी तारांबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com