Mount Makalu : भगवान चवले यांनी केले माउंट मकालु शिखर सर;आठ हजार मीटर उंच सहा शिखरं सर करणारे ते दुसरे महाराष्ट्रीयन
Maharashtra Mountain : कोथरूडच्या भगवान चवले यांनी ८,४८५ मीटर उंच माउंट मकालू शिखर सर केले आहे. आठ हजार मीटरपेक्षा उंच सहा शिखरं सर करणारे ते दुसरे महाराष्ट्रीयन ठरले आहेत.
खडकवासला : पुण्यातील कोथरूड येथील भगवान चवले यांनी रविवारी पहाटे आठ हजार ४८५ मीटर उंचीवरील माउंट मकालू शिखराला वयाच्या ४३व्या वर्षी गवसणी घातली आहे. आज शुक्रवारी ते पुण्यात दाखल झाले आहेत.