

भोसरी, ता. १० ः येथील पीएमटी चौकाजवळील रस्त्यावर पावसाळी गटाराचे चेंबर खचून खड्डा पडला आहे. या खड्ड्यांमध्ये दुचाकी घसरून दुचाकी चालक पडून जखमी होत आहेत. या चेंबरची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी वाहन चालक आणि नागरिकांमधून होत आहे.
भोसरीतील पीएमटी चौकात पावसाळी गटाराचे चेंबर रस्त्यावर आहे. या चेंबरचे झाकण खचले आहे. त्यामुळे चेंबरजवळ खड्डा पडला आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने हा खड्डा वाहन चालकांना दिसून येत नाही. त्यामुळे दुचाकी चालक या चेंबरवरून गेल्यास दुचाकी घसरून खाली पडत आहेत. त्यामुळे त्यांना दुखापत होत आहे. त्याचप्रमाणे रिक्षाही या खड्ड्यांमध्ये अडकत असून रिक्षा चालकांनाही या खड्ड्याच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.