Pune News: भीमाकाठच्या गावांना दिलासा; भामा आसखेडमधून सोडलेले पाणी वढू बंधाऱ्यात दाखल

Relief for Bhima River Villages as Water Reaches Vadhu Bundhara: भीमाकाठच्या गावांसाठी मोठा दिलासा! भामा आसखेडमधून सोडलेले पाणी वढू बंधाऱ्यात दाखल
Maharashtra Water Update Bhama Askhed Water Release Reaches Vadhu Bundhara Bringing Relief to Villages Along the Bhima River

Maharashtra Water Update Bhama Askhed Water Release Reaches Vadhu Bundhara Bringing Relief to Villages Along the Bhima River

sakal

Updated on: 

केसनंद : भीमा नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या भीमा नदीकाठच्या गावांसह वाघोली पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. भामा आसखेड धरणातून सोडण्यात आलेले पाणी वढू बंधाऱ्यात दाखल झाले असून, त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांसह वाघोली परिसराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार माउली कटके यांनी या प्रश्नासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com