

Bharat Taxi Launched in Pune
esakal
पुणे : ॲप आधारित खासगी कॅब कंपन्यांच्या मनमानीला आणि छुप्या शुल्काला वैतागलेल्या पुणेकरांना आता ‘भारत टॅक्सी’चा भक्कम पर्याय मिळाला आहे. अवघ्या काही दिवसांतच पुण्यात ‘भारत टॅक्सी’शी जोडल्या गेलेल्या रिक्षा आणि कॅब चालकांची (सारथी) संख्या तब्बल ६० हजारांवर पोहोचली. यात ३०० हून अधिक महिला चालकांचाही समावेश आहे. प्रवाशांची लूट आणि चालकांची पिळवणूक थांबवल्यामुळे या सेवेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.