Bharati prataprao Pawaresakal
पुणे
भारती प्रतापराव पवार यांचे निधन
Bharati Prataprao Pawar Demise: ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत
पुणे, ता. १७ : भारती प्रतापराव पवार (वय ७७) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. तसेच ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या त्या मातोश्री होत. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. १८) दुपारी १२ वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.