पिस्तूलची हौस अंगलट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

हौसेसाठी बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले; तर त्यास देशी बनावटीचे पिस्तूल विकणाऱ्यासही पोलिसांनी अटक केली.

पुणे - हौसेसाठी बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले; तर त्यास देशी बनावटीचे पिस्तूल विकणाऱ्यासही पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपींवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.

मनोहर रघुनाथ मांगडे (वय ४२, रा. सृष्टी हॉटेलजवळ, मांगडेवाडी), मारुती काट्याप्पा घोरपडे (वय ४३, रा. लासुर्णे, इंदापूर) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक सुबराव लाड, पोलिस कुंदन शिंदे व कृष्णा बढे गणेशोत्सवाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते तेव्हा कात्रज (गुजरवाडी) येथे एक व्यक्ती उभी असून त्याच्या कमरेला पिस्तूल असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार लाड, शिंदे व बढे घटनास्थळी आले. त्यांनी मांगडे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपयांची देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले. 

दरम्यान, पिस्तूल कसे आले, याबाबत विचारल्यानंतर त्याने मारुती घोरपडेचे नाव सांगितले. त्यानुसार, घोरपडे यालाही अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharati Vidyapeeth police seized the illegal pistol