

"विवाहितेचा करुण अंत: सासरची छळवणूक की क्रूरता?" कात्रजमधील घटनेने पुण्यात खळबळ; जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल.
sakal
पुणे : क्षुल्लक कारणावरून सासरी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना कात्रज परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सासऱ्यासह दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.