
पिरंगुट : पुण्यातील येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने संविधान दिंडी निघाली आहे. त्यासाठी वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर संविधान रथ काढण्यात आला असून श्रद्धा आणि भक्तीबरोबरच सर्वसामान्य जनतेपर्यंत भारतीय संविधानातील हक्क, अधिकार आणि कर्तव्यांचीही ओळख व्हावी आणि त्यांनी राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य करावे या उद्देशाने हा उपक्रम राबविला आहे.