esakal | भाटघर धरण ओव्हरफ्लो; धरणातून ८६२४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

भाटघर धरण ओव्हरफ्लो; धरणातून ८६२४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग

भाटघर धरण ओव्हरफ्लो; धरणातून ८६२४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोर(पुणे) : तालुक्यातील ब्रिटीशकालीन भाटघर धरण आज रविवारी (ता.१२) पहाटे १०० टक्के भरले असून धरणातून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु झाला आणि वीजनिर्मिती केंद्रही सुरु करण्यात आले. रविवारी पहाटे २ वाजता धरण फुल्ल झाले आणि धरणाच्या ४५ स्वयंचलीत दरवाजांपैकी ३ दरवाजे उघडले गेले. पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत राहिली.

रविवारी सकाळी ७ वाजता धरणातून ८ हजार ६२४ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु झाला. यामध्ये वीजनिर्मिती केंद्रातून १ हजार ६२४ आणि १० स्वयंचलीत दरवाजांमधून ७ हजार क्यूसेक्सचा समावेश आहे. गेल्यावर्षी भाटघर धरण 20 ऑगष्टला भरले होते. यावर्षी ऑगष्ट महिन्यात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने धरण भरण्यास 2२ दिवस उशीर झाला आहे. २३.७४ टीएमसी पाणीक्षमता असलेल्या भाटघर धरणास 45 स्वयंचलीत दरवाजे आहेत.

हेही वाचा: चंद्रकांत पाटील अफवा पसरवतात, त्या वक्तव्याचा राऊतांनी घेतला समाचार

भोर तालुक्यातील भाटघर, नीरा-देवघर आणि वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरण ही तीनही धरणे शंभर टक्के भरली आहेत. ११.९४ टीएमसी क्षमता असलेल्या नीरा-देवघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून ७५० क्यूसेक्स आणि तीन दरवाजांमधून १ हजार ७४४ क्यूसेक्स असे एकून २ हजार ४९४ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नीरा-देवघर धरण खो-याच्या साखळीतील वीर धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढ होणार आहे.

loading image
go to top