पारगाव - लाखणगाव, ता. आंबेगाव येथील भाऊ लहू सुक्रे व शीतल भाऊ सुक्रे या दांपत्याने तीन एकर क्षेत्रात टोमॅटोची शेती करून पहिल्या आठ तोड्यात दीड हजार क्रेट टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. साडेचार लाख रुपयांचे उत्पादन खर्च वजा जाता १० लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.