पुण्यातील भिडे पूल पाण्याखालीच; खडकवासल्यातून विसर्ग सुरुच

राजेंद्रकृष्ण कापसे
Sunday, 11 August 2019

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र, पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्याने रात्री 12 वाजता 23 हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविला होता. तो शनिवारी रात्रीही कायम होता. 

खडकवासला  : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र, पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्याने रात्री 12 वाजता 23 हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविला होता. तो शनिवारी रात्रीही कायम होता. 

दरम्यान, पानशेतमधून 4503 क्यूसेक, वरसगावमधून 6669 क्यूसेक तर टेमघर धरणातून 2943 क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. 
रविवारी सकाळी 14 हजार 115 क्यूसेकचा येवा होता. तर खडकवासला धरणात वरील पाण्याव्यतिरिक्त सुमारे 8 हजार क्यूसेकची आवक आहे. म्हणून 22 हजार 880 क्यूसेक सुरू आहे. 
रविवारी सकाळी 24 तासात टेमघर येथे 123, वरसगाव येथे 57, पानशेत येथे 63 व खडकवासला येथे 13 मिलीमीटर पाऊस पडला. 
एक जून पासून आज अखेर 71 दिवसात खडकवासला येथे
969, पानशेतला 2805, वरसगावमध्ये 2794, तर टेमघर येथे 4013 मिलीमीटर पाऊस झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhide bridge again in under water