Bhide Wada : मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाईंच्या लढ्याचा साक्षीदार भिडे वाडा!

याच वाड्यात सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली
Savitribai Fule
Savitribai FuleEsakal

बुधवार पेठमधील भिडे वाडा गेले अनेक वर्षांपासून पडक्या अवस्थेत आहे. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या भिडे वाड्याचे जतन करण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील ज्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या भिडे वाडा स्मारक प्रश्नी राज्य सरकार गंभीर असून त्यावर तत्काळ बैठक घेऊन मार्ग काढला जाईल. याशिवाय स्मारकासाठी लागेल तेवढा निधी उपलद्ध करून दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली

याच भिडेवाड्यात कधीकाळी मुलींची शाळा भरायची. आधी हजेरीपटावर एक दोन नावे असायची. पण, नंतर ती शेकडोंच्या संख्येने भरले. आज या भिडे वाड्याला अनेक यातना होत असतील. याच वाड्यात सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. त्याच वाड्याची अवस्था आज दयनीय झालीय. तिथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचा प्रश्नही अनेक वर्ष प्रलंबित होता.

ज्या काळात स्त्रीला केवळ एक भोगवस्तू मानले जायचे. सावित्रीबाईंना स्वत: शिक्षण घेणे गरजेचे होते. त्यामूळे ज्योतिबांनी दुपारच्या वेळी आपण शाळेत काय शिकत आहोत त्यांना वाचून दाखवले.

ज्योतिराव वाचून दाखवत असत समजावूनही सांगत असत. जोतिरावांना वाटे आपली पत्नी सावित्रीही शिकली पाहिजे. त्यांना सावित्रीला शिकवावयाचे होते. घरात तर पती-पत्नीलाही बोलायला मनाई होती. अशा परिस्थितीतही जोतिबांनी सावित्रीला शिकविण्याचा दृढनिश्चय केला आणि त्यावर तोडगा काढला.

घरी सावित्रीबाईंनाा शिकविता येत नव्हते. म्हणून ज्योतिबांनी शेताची निवड केली. दररोज शाळा संपली की, ज्योतिबा मळ्यात जाऊ लागले आणि सावित्रीबाईला व मावस बहीण सगुणाबाई यांना जमिनीची पाटी करून काडीची पेन करून बाराखडी शिकवायला सुरुवात केली. झाडाची पाने तोडून एक, दोन मोजून उजळणी घेऊ लागले. जमिनीच्या पाटीवर शंभरापर्यंचे पाढे आणि संपूर्ण मराठी बाराखडी शिकविण्यात आली.

सन १८४७ मध्ये ज्योतिबांनी सावित्रीचे अध्यापनाचे शिक्षण पूर्ण केले. ते एवढ्यावरच थांबलेले नाहीत.त्यांनी समाज परिवर्तनाचा ध्यास घेतला. त्या काळात अहमदनगर येथे इंग्रज महिला मिस फॅरार हिने गोया लोकांच्या मुलींसाठी शाळा चालवित होती. तेथे जाऊन ज्योतिरावांनी शाळा कार्यप्रणालीचा अभ्यास केले आणि अशीच शाळा पुण्यात काढण्याचे ठरविले.

ज्योतिरावांनी पुण्यातील मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्या सहकार्याने गंज पेठेतील जागेत मुलीची शाळा ०१ जानेवारी १८४८ रोजी सुरू केली. हा दिवस भारतातील लोकांसाठी शिक्षणाचा क्रांतिकारी दिवस ठरला.

या शाळेतील मुलींना शिक्षण शिकविण्याचा पहिला बहुमान सावित्रींना मिळाला. भारतीय स्त्रियांच्या समग्र क्रांतिपर्वाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी चार ब्राह्मण, एक मराठा, एक धनगर अशा सहा मुलींनी शाळेत प्रवेश घेतला.

Savitribai Fule
खूशखबर! मुलींची पहिली शाळा 'भिडे वाड्या'चा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा

पुण्यात ज्योतिरावांनी मुलींची शाळा काढली असून त्या शाळेची शिक्षिका सावित्री आहे, हे समजताच उच्च वर्गातील तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यांनी पुण्यात दंगा केला की, धर्माप्रमाणे स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाही, स्त्रियांना शिकविणे अधर्म आहे.ते काम धर्माच्या विरोधात आहे. स्त्रीने शिक्षण शिकणे म्हणजे पाप आहे. जात बुडेल, धर्म बुडेल आणि पृथ्वीवर पाप वाढून एक दिवस ही पृथ्वी बुडून जाईल आणि देव सर्वमानव जातीचा संहार करतील.

अशी दहशत ब्राह्मणांनी पुण्यात सुरू केली होती. एवढ्यावरच न थांबता सावित्री शाळेला जाताना दगड, शेण मारा करू लागले. जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. त्यावेळी जोतिरावाचे व्यायाम शाळेतील गुरू लहुजी वस्ताद व राणबा महार सावित्रीबाईच्या मदतीला धावून आले. त्यांनी सावित्रीला सुरक्षित शाळेत नेण्याचे व आणण्याचे कार्य सुरू केले.

Savitribai Fule
Bhide Wada : 'भिडेंना मला भेटायला सांगा'; सरकारचं दुर्लक्ष अन् हरी नरकेंचा किस्सा

या भिडे वाड्याने हा ऐतिहासिक लढा उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. त्या वाड्याच्या जीर्ण झालेल्या भिंती आजही त्या लढ्याच्या साक्षीदार आहेत. अशा वाड्यात भिडे वाड्यात स्वच्छता तर नव्हती. उलट याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह बाबी दिसून आल्या होत्या. त्यामूळे तिथली स्वच्छता करून तिथे स्मारक व्हावे अशी मागणी अनेक वर्ष होत होती. त्यासाठी अनेक आंदोलनेही झाली. त्यामूळे आता राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय आशादायी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com