Bhide Wada : 'भिडेंना मला भेटायला सांगा'; सरकारचं दुर्लक्ष अन् हरी नरकेंचा किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhide Wada Hari Narke
Bhide Wada : 'भिडेंना मला भेटायला सांगा'; सरकारचं दुर्लक्ष अन् हरी नरकेंचा किस्सा

Bhide Wada : 'भिडेंना मला भेटायला सांगा'; सरकारचं दुर्लक्ष अन् हरी नरकेंचा किस्सा

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची दुरावस्था हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सरकारं आली गेली, पण भिडे वाड्याच्या अवस्थेत तसूभरही बदल झालेला नाही. यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये माजी मंत्री छगन भुजबळ यांनी हा मुद्दा लावून धरला आहे, तर रोहित पवार यांनीही याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

आता हे सरकार तरी भिडेवाड्याच्या संवर्धनासाठी काही हालचाल करतंय का, हे पाहावं लागेल. याच पार्श्वभूमीवर लेखक विचारवंत प्रा. हरी नरके यांनी आपल्या एका ब्लॉगच्या माध्यमातून एक अनुभव कथन केला आहे. यामध्ये त्यांनी भिडेवाड्याप्रती प्रशासन आणि अधिकाऱ्यांची उदासिनता मांडली आहे. हा ब्लॉग खालीलप्रमाणे -

अधिकारी- "हॅलो, मी मंत्रालयातून अमूकतमूक अधिकारी बोलतोय. मी काल तुम्हाला फोन केला होता, तुम्ही का उचलला नाही? मला भिडेवाड्यासंबंधात माहिती हवीय. अमूक ढमूक मंत्र्यांना मला त्याबाबतचा रिपोर्ट सादर करायचा आहे. कुठे आहे हा भिडेवाडा?"

मी- "पुण्यात, बुधवार पेठेत."

अधिकारी- "कोणी बांधलाय तो?"

मी- " तात्यासाहेब भिड्यांनी."

अधिकारी- "त्यांना सगळी कागदपत्रे घेऊन मला भेटायला सांगा."

मी- "ते वारले त्याला आता १७० वर्षे झाली."

अधिकारी- "मग आता कोण मालक आहेत?"

मी- "खाजगी मालकी आहे."

अधिकारी- "वाड्याची अवस्था कशीय?"

हेही वाचा: Bhide Wada : बापाने गोणीत घालून शाळेत नेलं आणि सावित्रीच्या लेकीने इतिहास घडवला

मी- " अतिशय वाईट. कुठल्याही क्षणी तो पडेल. तिथले मालक, भाडेकरू दुकानदार, निवासी भाडेकरू कोर्टात गेलेत. मुंबई हायकोर्टात ती केस गेली २० वर्षे पेंडींग आहे."

अधिकारी- "तुम्ही पार्टी आहात का?"

मी- "नाही."

अधिकारी- "मला केस नंबर व कोर्टाची सगळी कागदपत्रे पाठवा. तिथे शाळा कशावरून होती? कोणकोण वादी-प्रतिवादी आहेत त्यांचे मला फोन नंबर द्या. त्यांना मला मंत्रालयात येऊन भेटायला सांगा."

हेही वाचा: Bhide Wada : भिडेवाड्यानंतर फुले दाम्पत्याने सुरू केलेल्या शाळा कोणत्या?

मी- " जोतीराव-सावित्रीबाईंच्या तिथल्या शाळेचे सगळे पुरावे मी कोर्टाला सादर केलेले आहेत. तुम्हाला फक्त निकाल लवकर यावा यासाठी उच्च न्यायालयाकडे शासनामार्फत पाठपुरावा करायला हवा."

अधिकारी- " तुम्ही, मला सगळे पेपर्स आणून द्या आणि वाड्याबद्दलचा रिपोर्ट तयार करून मला मंत्रालयात आणून द्या, मी तो मंत्र्यांना सादर करतो. वाड्याची एकुण जागा किती आहे? सर्व्हे नंबर किती आहे? वाड्याचे जुने व ताजे फोटो काढून मला कागदपत्रांसह २ दिवसात आणून द्या."

मी- " तुम्ही उंटावरून शेळ्या हाकण्याऎवजी जरा बूड हलवा आणि रिपोर्ट बनवा. मी तुमचा नोकर नाही. आणि मला कसले आदेश देताय? तुमच्या कर्मचार्‍यांना जरा कामाला लावा. नाहीतरी फुकटचाच पगार खातात ना ते आणि तुम्हीही?"

- प्रा. हरी नरके,

टॅग्स :mahatma phule