

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे मंगळवारी दुपारी सुमारे ४ वाजता घडलेल्या भरदिवसा अपहरण प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. २१ वर्षीय तरुणी लग्नाच्या खरेदीसाठी आई आणि भावासोबत दुचाकीवरून घरी परतत असताना दोन सख्ख्या भावांनी मिरचीपूड डोळ्यात टाकून मारहाण करत तिला जबरदस्तीने टेम्पोमध्ये नेल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.