
पुणे – भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिसांनी वाहतुकीचे विशेष नियोजन केले असून मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. अभिवादनासाठी जाणाऱ्यांनी हे बदल जाणून घेणे आवश्यक आहे.