esakal | प्रश्न सोडविण्यासाठी कुणाशीही बोलण्याची तयारी - सुळे
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya Sule

प्रश्न सोडविण्यासाठी कुणाशीही बोलण्याची तयारी - सुळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजे : तालुक्यातील भीमा पाटस साखर कारखान्यांचा विषय गंभीर आहे. परंतु लोकांचा प्रश्न सोडविण्यासाठी कुणाशीही बोलण्याची आपली तयारी असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. देऊळगाव राजे ( ता.दौंड ) येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने लिंगाळी मलठण जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित केला होता. यामध्ये सुळे बोलत होत्या.

कार्यक्रमाला जिल्हा बॅकेचे अध्यक्ष रमेश थोरात,पंचायत समितीच्या सभापती हेमलता फडके,उपसभापती विकास कदम,जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे, जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार,पंचायत समितीच्या सदस्या ताराबाई देवकाते, गुरूमुख नारंग,बादशहा शेख,मनिषा लव्हे,सरपंच स्वाती गिरमकर उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, जिल्हा बॅकेत अतिशय चांगले कामकाज चालले आहे. शेतकय्राच्या सहकार्यामुळे दौंड शुगर साखर कारखाना चांगला चालला असून इतरही कारखाने चालु करण्यासाठी आपले प्रयत्न होतील. जिल्हा परिषदेने केलेल्या चांगल्या कामकाजामुळे त्याचा कार्यअहवाल प्रकाशित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यानी आगामी निवडणुकीसाठी तयार रहाण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच साखर कारखाने डबघाईला आणल्याल्यांणी देशाचे सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याबद्दल आश्वर्य व्यक्त केले.

थोरात म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून तालुक्याचा मोठा विकास झाला आहे. लिंगाळी मलठण या जिल्हा परिषद गटात मोठया प्रमाणात विकासाची कामे झाली आहेत. भिमा पाटसच्या कारभाराची ईडीच्या मार्फत चौकशी लावण्याची मागणीही त्यांनी केली. जगदाळे म्हणाले, दौंड शुगरच्या वतीने शेतकय्राची दिवाळी गोड करणार आहे. देऊळगाव राजे येथील बंधाय्राची दुरूस्ती व भिंतीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. चालुवर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाण्याचे चांगले नियोजन केल्यामुळे तालुक्यात भीमानदी व कॅनालला पाणी कमी पडले नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आप्पासाहेब पवार,शिवाजी काळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अमित गिरमकर यांनी केले. तर आभार विष्णुपंत सुर्यवंशी यांनी मानले. दरम्यान तालुका नियत्रंण विघुत समितीच्या सदस्यपदी अमित गिरमकर तर संजय गांधी निराधर योजनेच्या समिती सदस्यपदी नवनाथ थोरात यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

loading image
go to top