भीमा खोऱ्यातील १३ धरणात १०० भरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dam

भीमा खोऱ्यातील १३ धरणे १०० टक्के भरली

खडकवासला, ता.२१ : भीमा खोऱ्यातील २६ धरणांपैकी १३ धरणे शंभर टक्के आज भरलेली आहेत. यातील सर्वच धरण पुणे जिल्हातील आहे. तर काही धरणे रायगड, सातारा, नगर व सोलापूर जिल्ह्यालगत आहे.

मुळशी, टेमघर, वरसगाव, खडकवासला, पानशेत, चासकमान, कळमोडी, वडिवळे, आंद्रा, पवना नीरा-देवघर, भाटघर, नाझरे ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर उजनी ९९.७८, वीर ९८, गुंजवणी ९९.३८, कासारसाई ९५.८३, भामा-आसखेड ९५.४५, चिल्हेवाडी ७६.५५, विसापूर ९७.५६, घोड ८१, डिंभे ९५.५६, वडज ९४.५७, येडगाव ८२.४४, माणिकडोह ६९.६७, पिंपळगाव जोगे ९३.१० टक्के भरलेली आहेत.

पावसाचा जोर कमी, विसर्ग देखील कमी

पानशेत, वरसगाव व टेमघर धरणाचे पाणलोट क्षेत्रात शनिवार व रविवारी पावसाचा जोर कमी झाला आहे. परिणामी या धरण्यातून सोडला जाणारा विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे.

पानशेत धरण शंभर टक्के भरले आहे. या धरणात आज दिवसभर दोन मिलीमीटर पाऊस झाला. रविवारी संध्याकाळी ६८३ क्युसेक पाणी सोडले आहे.

वरसगाव धरण शंभर टक्के भरले आहे. येथे पाच मिलिमीटर पाऊस झाला. या धरणातून ३०० व वीज निर्मितीसाठी ५७० असे ८७० क्युसेक पाणी सोडले आहे.

टेमघर धरण धरण शंभर टक्के भरले आहे. येथे सहा मिलिमीटर पाऊस पडला आहे. या धरणातून १०० व वीज निर्मितीसाठी २५० असे ३५० क्युसेक पाणी सोडले आहे.

पानशेत, वरसगाव व टेमघर धरणातील एकूण पाणी एक हजार ९०३ क्युसेक पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे.

खडकवासला धरणात आज पाऊस पडला नाही. तीन हजार ४२४ क्युसेक पाणी मुठा नदीत सोडले आहे. तसेच खडकवासला धरणाच्या कालव्यातून १००५ क्युसेक पाणी सोडले आहे. आतापर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत सुमारे १२.४७ टीएमसी पाणी सोडले आहे. ते पाणी उजनी धरणात जमा होत आहे.

Web Title: Bhima Valley 13 Dams Less Rainfall

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..